S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

नागपूरमध्ये दिवसाढवळ्या प्राॅपर्टी डीलरची निर्घृण हत्या

याच परिसरात पानटपरी चालवणाऱ्या सोनू साहू याने तलवारीने आणि दगडाने ठेचून या व्यक्तींची हत्या केली असल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे.

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2017 08:31 PM IST

नागपूरमध्ये दिवसाढवळ्या प्राॅपर्टी डीलरची निर्घृण हत्या

13 आॅक्टोबर : नागपूरच्या कपीलनगरात दिवसाढवळ्या एका प्राॅपर्टी डिलरची तलवारीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. राजेश पुरण नंदेश्वर असं या तरुण प्राॅपर्टी डीलरचं नाव आहे.

याच परिसरात पानटपरी चालवणाऱ्या सोनू साहू याने तलवारीने आणि दगडाने ठेचून या व्यक्तींची हत्या केली असल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे.

सोनु शाहू याने ज्या प्लाॅटवर अतिक्रमण करून पानटपरी सुरू केली होती तो प्लाॅट मृत राजेशनं एका व्यक्तीस विकला होता. या प्लाॅटवरील अतिक्रमण हटवण्यासाठी राजेश सोनुच्या मागे लागला होता. काल रात्रीही तो सोनुला या प्लाॅटवरील आपले दुकान हटवण्यासाठी विनंती करण्यासाठी आला होता.आज दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा राजेश सोनुच्या दुकानात आला असता सोनुने तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला नंतर दगडानेही हल्ला केला त्यात जागीच राजेशचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात जरिपटका पोलीस आरोपी सोनू आणि आणखी एका आरोपीचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 08:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close