16 नोव्हेंबर : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले याचा सर्वात जास्त आनंद झाला तो परभणीकरांना. मात्र या आनंदावर विरजण फिरण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणावर मराठवाड्यातील सर्वात जास्त म्हणजे १ लाख २१ हजार हेक्टर रब्बीचं सिंचन क्षेत्र असलेला परभणी जिल्हा यंदा जायकवाडी पूर्ण भरल्यानंतरही कोरडाच राहण्याची शक्यता पाठबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळेच निर्माण झाली.
याचं कारण जिल्ह्यातील तब्बल २०० किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या या कालव्यांची अवस्था बघा. ठिकठिकाणी हे कालवे फुटलेत, १०-१० फूट वाढलेला गाळ, शिवाय याच कालव्याच्या वितरिका आणि उपवितरिका यांची ही अवस्था बघा. यांच्यात तर झाडंच एवढी वाढली आहेत की पाणी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
त्यात भर टाकलीय ती वितरिकांच्या तुटलेल्या दरवाज्यांनी. त्यामुळे जे पाणी हजारो किलोमीटर वरून शेतकऱ्यांच्या बांधावर पोचते ते पाणी या अडथळ्यांमुळे पोचणार नाहीये.म्हणून तात्काळ या कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी वर्ग करतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा