दाऊदचं नाशिक कनेक्शन, कोणत्या नातेवाईकाचं होतं 'ते' लग्न ?

दाऊदच्या नातेवाईकाच्या या लग्नात पोलिसांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यानी हजेरी लावली होती

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 08:17 PM IST

दाऊदचं नाशिक कनेक्शन, कोणत्या नातेवाईकाचं होतं 'ते' लग्न ?

25 मे : नाशिकमध्ये झालेल्या एका विवाह सोहळ्याने देशात खळबळ उडवून दिली आहे. दाऊदच्या नातेवाईकाच्या या लग्नात पोलिसांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यानी हजेरी लावली होती.

नाशिकचे जक्की कोकणी हे दाऊदचा लहाना भाऊ इकबाल कासकर याचे साडू आहेत. तसंच जक्की कोकणी यांची मोठी मुलगी इकबाल कासकरची सून आहे. जक्की कोकणी यांच्या दुसऱ्या मुलीचा निकाह नाशिकमध्ये होता आणि त्याचवेळी अनेक अंडरवर्ल्डचे लोकं,पोलीस अधिकारी आणि नेते उपस्थित होते असा संशय आयबीला होता.

यासंदर्भात नाशिक पोलीस आयुक्तांनी देखील लग्नात सहभागी झालेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, आपले नातेसंबंध दाऊदच्या लहान्या भावाशी पूर्वीपासून असल्याची स्पष्टोक्ती इकबाल कासकाराचा साडू आणि या लग्नातील मुलीचे वडील असलेल्या जक्की कोकणी यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर जक्की कोकणी यांनी आयबीएन लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...