प्रियांका चतुर्वेदी करणार शिवसेनेमध्ये प्रवेश? ही आहे INSIDE STORY

शुक्रवारी दुपारी संजय राऊत पत्रकार परिषद घेत प्रियांका चतुर्वेदी यांच्या शिवसेना प्रवेशाची अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

उदय जाधव उदय जाधव | News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 12:57 PM IST

प्रियांका चतुर्वेदी करणार शिवसेनेमध्ये प्रवेश? ही आहे INSIDE STORY

नवी दिल्ली, 19 एप्रिल : प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. पण एकीकडे या चर्चांणा शिवेसेनकडून पूर्णविऱ्हाम देण्याचा प्रयत्न करण्यात आला तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत हे दुपारी पत्रकार परिषद घेऊन प्रियांका चतुर्वेदी यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

एकीकडे प्रियंका चतुर्वेदी यांच्या प्रवेशाच्या वृत्ताला शिवसेनेनं दुजोरा दिला नाही. तर दुसरीकडे आज दुपारी प्रियांका या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या याबद्दल संभ्रम असून या महत्त्वाच्या बातमीकडे आज सर्वांचं लक्ष असणार आहे.


Loading...'प्रियंका या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत पण पक्ष प्रवेशाबाबात अद्याप निर्णय घेतला नाही' अशी माहिती शिवसेनेच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे. दिल्लीतल्या शिवसेनेच्या नेत्यांशी प्रियंका यांनी संपर्क साधला होता. पण त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रियांका चर्तुवेदी या शिवसेने प्रवेश करणार या चर्चा खोट्या असल्याचं सांगण्यात येत आहे.

राहुल गांधींना मोठा धक्का, प्रियंका चतुर्वेदींनी दिला राजीनामा

पक्षात गुंडांना प्राधान्य दिले जात असल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटर प्रोफाईलमधून काँग्रेस प्रवक्ता असल्याचं काढून टाकलं आहे. त्यांनी गुरुवारी रात्री काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष राहुल गांधींकडे दिला असल्याचे समजते.लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले असताना प्रचाराच्या ऐन धामधुमीत राष्ट्रीय प्रवक्त्या असलेल्या चतुर्वेदींच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : VIDEO : भर सभेत हार्दिक पटेलांच्या कानाखाली पेटवली

नेमकं काय झालं?

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सप्टेंबर 2018मध्ये राफेलच्या भ्रष्टाचारावर मथुरा इथं पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व कार्यकर्त्याचं निलंबन पक्षाने मागे घेतलं. त्यामुळे प्रियंका दुखावल्या गेल्या आणि त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षासाठी शिवीगाळ सहन केली, ट्रोलिंग सहन केलं, घाम गाळला, मात्र आपल्यासोबत दुर्व्यवहार करणाऱ्यांना कुठलीही शिक्षा न करता त्याचं निलंबन मागे घेण्यात आलं हे अतिशय दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली होती.

काय आहे हे प्रकरण?

राफेल करारावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी मथुरेत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर संबंधित नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर या नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले आहे. प्रियंका यांनी पक्षाला लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे.

सर्वच पक्ष सारखे

निवडणुका असल्याने मतांसाठी राजकीय पक्ष कुठल्याही थराला जातात. प्रियंका या काँग्रेसच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आहेत. त्यांच्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना पुन्हा पक्षात घेत असतील तर ते अतिशय चुकीचं असल्याचं मत पत्रकार रामकृपाल सिंह यांनी व्यक्त केलं. मतांसाठी राजकीय पक्ष काहीही करायला तयार होतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं.


हेमंत करकरेंबद्दल साध्वींचे धक्कादायक वक्तव्य, 'त्यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं' पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...