गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आणखी एका विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा

कन्नड तालूक्यातील तांदूळवाडीत 17 वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2018 09:02 PM IST

गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आणखी एका विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा

औरंगाबाद, 23 ऑगस्ट : कन्नड तालूक्यातील तांदूळवाडीत 17 वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. प्रियंका बजरंग मोरे असे विद्यार्थिनीचे नाव असून, गुरुवारी पहाटे तीने राहत्या घरात गळफास घेतला. गेल्या कही दिवसांपासून तील काही गावगुंड वारंवार फोन करून त्रास द्यायचे. घरी कुणी नसताना घरी जाऊन तीला त्रास देण्याइतपत त्यांनी मजल मारली होती. प्रियंकाच्या आत्महत्येस हेमंत साहेबराव सावंत, ज्ञानेश्वर बाजीराव गोडसे हे दोघेजण कारणीभूत असल्याचा आरोप तीच्या वडीलांनी केलाय.

बारामतीतल्या झारगडवाडी येथे रोडरोमीओंच्या त्रासाला कंटाळून 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी समोर आली होती. त्यानंतर आज कन्नड तालूक्यातील तांदूळवाडी येथे गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून प्रियंकाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय.

प्रियंकाने काल रात्रीसुद्धा गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच घरच्यांनी ताबडतोब तीला सावरले. आज पहाटे तीन वाजता मी उठलो होतो, तेव्हा ती झोपलेली होती. पण, त्यानंतर तीने परत गळफास घेतल्याचे प्रियंकाचे वडील बजरंग मोरे यांनी सांगितले. माहिती मळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रियंकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्रियंकाचे वडीलांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून, पोलीस अधीक तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 08:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...