शुल्क नियंत्रण कायदा मोडणाऱ्या मेडिकल कॉलेजवर कारवाई होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 11, 2017 04:40 PM IST

शुल्क नियंत्रण कायदा मोडणाऱ्या मेडिकल कॉलेजवर कारवाई होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन

11 मे : वैद्यकीय शिक्षण शुल्कवाढीवरून मोठ्या संभ्रमाचं वातावरण मुलांमध्ये ऐन परीक्षेच्या तोंडावर निर्माण झालं आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी केलेली भरमसाठी फी वाढीवर आमच्या बेधडक या कार्यक्रमात खडाजंगी चर्चा झाली.

'बेधडक' या कार्यक्रमात पालकांनी वैद्यकीय शिक्षणाच्या फी वाढीबाबत आपली भूमिका मांडली. परंतु, सरकारची शुल्क नियंत्रण समिती यावर काय पावलं उचलणार हाही खरा प्रश्न आहे. कायम हवी तेवढी फी भरून त्याला मुकसंमती देणारे पालकही तितकेच जबाबदार आहेत, अशी टीका या फीवाढी विरुद्ध लढणारे डॉ. कोरडे यांनी केली.

सरकारी कॉलेजेसप्रमाणे खाजगी कॉलेजची फी ठरवता येत नाही, त्यामुळेच त्यांची फी काही लाखांमध्ये जाते, असा दावा जे जे मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी केला.

दरम्यान, शुल्क नियंत्रण समिती जे शुल्क ठरवून देईल, त्यानुसारच सगळ्या खाजगी कॉलेजेसना शुल्क आकारावं लागेल. जर त्यांनी त्याचं उल्लंघन केलं, तर त्यांची मान्यता आम्ही रद्द करू, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आमच्या बेधडक या कार्यक्रमात केला.

खरं पाहता, मेरिटनुसार एखादा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एवढी लाखानिशी फी भरून पुढच्या काळात वैद्यकीय शिक्षण घेण्याचं धाडस करेल का हाही एक कळीचा प्रश्न आहे. बघुयात यावर सरकार कसा मार्ग काढतं ते...मार्ग निघेपर्यंत आम्ही मात्र पाठपुरावा करत राहणार....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2017 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...