महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाण घेणार राहुल गांधींची जागा?

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाण घेणार राहुल गांधींची जागा?

प्रियांका गांधी यांच्या नावाचाही अध्यक्षपदासाठी विचार झाला. पण तो मान्य करण्यात आलेला नाही. राहुल, प्रियांका यांनीच तो प्रस्ताव नाकारला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मे : काँग्रेसच्या राजकारणात महाराष्ट्राच्या दृष्टीने एक सुखद धक्का देणारं वळण आलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे येत आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिला, तर त्यांच्या जागी पक्षाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज यांची वर्णी लागायची शक्यता आहे. दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक थोड्याच वेळात होणार आहे, त्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं याची चर्चा होण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या चर्चेतलं सगळ्यात मोठं नाव ठरेल. पृथ्वीराज चव्हाण यांनी साधारण 10 वर्षं पंतप्रधान कार्यालयात काम केलं आहे. शिवाय ते सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या केंद्रीय पातळीवरच्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड काँग्रेसच्या अध्यक्षपदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना विचारलं असता ते म्हणाले, "काँग्रेसची सध्याची अवस्था बिकट आहे. त्यांच्याकडे दुसऱ्या फळीतले नेतेच नाही. संघटना कमकुवत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा नेता मिळला तर चांगलंच आहे. पण चव्हाण यांचं संघटन कौशल्य वादातीत नाही. त्यांच्याच काळात महाराष्ट्रात काँग्रेसची संघटना कमकुवत झाली होती, असा आरोप केला जातो. पण हा इतिहास बाजूला ठेवला, तर काँग्रेसच्या बाजूचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आले आहेत. राफेल प्रकरण किंवा सनातनच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचा पक्षाला फायदा झाला. पक्षाची पुनर्बांधणी करताना त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि दिल्लीतला अनुभव कामाला येऊ शकतो."


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाल्यानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस कोअर कमिटीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये यासाठी त्यांना विनंती केली आहे. अध्यक्षपदावर राहुलच राहावेत, असं पक्षाचं म्हणणं आहे, पण सध्या तरी राहुल आपला निर्णय बदलण्याच्या तयारीत नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल यांनी पक्षाला नवा अध्यक्ष शोधण्यासाठी आणि नेमणुकीसाठी एक महिन्याची मुदत द्यायची तयारी दर्शवली आहे.

प्रियांका गांधी यांच्या नावाचाही अध्यक्षपदासाठी विचार झाला. पण तो मान्य करण्यात आलेला नाही. राहुल, प्रियांका यांनीच तो प्रस्ताव नाकारला आहे.

INSIDE STORY : राहुल गांधींच्या राजीनामा नाट्यामागे आहे 'हा' मोठा प्लॅन

लोकसभेच्या विजयानंतर आता फडणवीस पवारांना देणार मोठा धक्का!

VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण; खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया


काँग्रेसचं आत्मचिंतन सुरू आहे. काँग्रेस कार्यकारिणीची दुसरी बैठक या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नव्या अध्यक्षासंदर्भात विचार होऊ शकतो. याच बैठकीत राहुल गांधी राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पहिल्या बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर यूपीए अध्यक्षस्थानी असणाऱ्या सोनिया गांधींनीच त्यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळला होता.

राहुल यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधी धडा शिकवायचं ठरवलं आहे. त्यासाठीच त्यांना अध्यक्षपदावर राहायचं नाही. गांधी परिवारातलं कुणीच अध्यक्षपदावर राहू नये, अशी त्यांची इच्छा आहे, कारण तेव्हाच गांधी परिवाराचं पक्षातलं नेतृत्व इतरांच्या लक्षात येईल. या विचारामागे इतिहास आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस परिवारातलं कोणी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा घेऊ नये, यासाठी काही तत्कालीन ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले होते. काँग्रेसची अवस्था बिकट झाल्यानंतर 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी सीताराम केसरींना हटवून स्वतः काँग्रेसची सूत्र हाती घेतली. तेव्हापासून पुन्हा एकदा काँग्रेसवर गांधी परिवाराची पकड घट्ट आहे.

HSC Result : इथे चेक करा तुमचा निकाल फक्त एका क्लिकवर

पण अर्थातच त्या वेळचा काळ वेगळा होता. तेव्हा काँग्रेसच्या पुढची आव्हानं वेगळी होती. आता काँग्रेससमोर असलेला प्रतिस्पर्धी खूपच ताकदवान झाला आहे. त्याच्याशी लढा देताना इतिहासातली ही खेळी किती उपयोगी पडणार हे लवकरच कळेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 06:09 PM IST

ताज्या बातम्या