दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ, नरेंद्र मोदी यांची घोषणा

दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ, नरेंद्र मोदी यांची घोषणा

शिर्डी इथं झालेल्या जाहीर सभेत मोदींच्या हस्ते 20 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप करण्यात आलं. यावेळी मोदींनी दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या राज्यातील जनतेला दिलासा देणारी घोषणा केली.

  • Share this:

शिर्डी, 19 ऑक्टोबर : शिर्डी इथं झालेल्या जाहीर सभेत मोदींच्या हस्ते 20 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप करण्यात आलं. यावेळी मोदींनी दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या राज्यातील जनतेला दिलासा देणारी घोषणा केली. त्यांनी दुष्काळ निवारणासाठी मदत कमी पडू देणार नाही, वाट्टेल तितका निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिर्डीत साईसमाधी सोहळ्याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. मोदींनी शिर्डीत आल्यावर साईबाबांची मनोभावे पूजाअर्चा केली. यावेळी खास आरती पण करण्यात आली. मोदींचं साईबाबा संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आलं.

मोदींनी यावेळी अभिप्राय लिहून दानपेटीत दानही केलं. आणि यावेळी साईबाबांच्या शताब्दी महोत्सवाची सांगता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिर परिसराची पाहणी केली आणि साईभक्तांसोबत फोटोही काढले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार

Loading...

- गेल्या चार वर्षात हक्काचं घर देण्यासाठी प्रयत्नशील

- यापूर्वीही प्रयत्न झाले, पण ते गरीबांसाठी नव्हते तर एका कुटुंबाचा प्रचार करण्यासाठी होते

- गॅस, वीज कनेक्शन याबाबत यापूर्वी विचार केला गेला नाही

- शिर्डी, अजिंठा यासारखे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार

- जनआरोग्य योजनेचा देशातील 50 करोड नागरिकांना लाभ होणार

पंतप्रधानांचा अभिप्राय  

- साईबाबांच्या दर्शनाने मनाला असीम शांतता लाभली. साईबाबांचा श्रद्धा,सबुरीचा संदेश मानवतेला प्रेरणा देणारा आहे. शिर्डीत सर्वधर्मसमभावाचं अद्भूत रूप पहावयास मिळते. सगळ्या जाती-धर्म-पंथाचे लोक येऊन साईबाबांसमोर नतमस्तक होतात.

साईबाबांचा 'सबका मालिक एक है' हा महामंत्र वैश्विक शांतीसाठी महत्त्वाचा आहे. सगळ्या साईभक्तांवर साईबाबांचा आशीर्वाद राहो, त्यांना सुख-शांती लाभो ही मनोकामना व्यक्त करून माझ्याकडून साईबाबांना नमन.

VIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2018 10:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...