पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर; विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने केली निदर्शनं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. पण मोदींच्या फसव्या घोषणांविरोधात राष्ट्रवादीने निदर्शनं काढली आहे. मोदींच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2019 10:36 AM IST

पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर; विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने केली निदर्शनं

सोलापूर, 09 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. पण मोदींच्या फसव्या घोषणांविरोधात राष्ट्रवादीने निदर्शनं काढली आहे. मोदींच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली आहे.

2 कोटी युवकांना रोजगार, सोलापूरला टेक्स्टाईल हब करण्याचे आश्वासन, धनगर आणि मुस्लीम आरक्षण आदी गोष्टींची पूर्तता न केल्याने आंदोलन करण्यात आलं. तर आंदोलन करणाऱ्या  राष्ट्रवादीच्या पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना  पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा सोलापूर दौरा?

सोलापूर दौऱ्यावेळी मोदींच्या हस्ते 30 हजार घराच्या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्टसिटी अंतर्गत झालेल्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे.

इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे. यासाठी सोलापूरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

Loading...

सोलापुरातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा सोलापुरात तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी 1 लाख लोक बसू शकतील अशी सोय इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर भाजपतर्फे करण्यात आली आहे.


Special Report : कोमात गेलेलं बाळ 40 दिवसांनंतर शुद्धीवर, डॉक्टरांनाही अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...