टिकटिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामतीतील सभेचं काऊंटडाऊन सुरू

टिकटिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामतीतील सभेचं काऊंटडाऊन सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बारामतीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, सागर कुलकर्णी, 31 मार्च : बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला! सुप्रिया सुळे या बारामतीतून खासदार असून राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता बारामतीच्या मैदानात उतरले असून 10 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी बारामतीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. भाजपनं कांचन कुल यांना सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आणि शरद पवारांना थेट आव्हान देण्यासाठी आता नरेंद्र मोदी बारामतीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीतील नरेंद्र मोदींच्या सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, यापूर्वीच भाजपनं शरद पवार यांना आव्हान दिलं असून महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात,' असा गंभीर आरोप केला होता. त्याला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'जंगलातील शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकतात' अशी खालच्या पातळीवर उतरून प्रत्युत्तर दिलं. निवडणुकीच्या तोंडावर आता दोन्ही पक्षांमध्ये आरोप - प्रत्यारोप रंगले आहेत.


'शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत', आव्हाडांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका


2014च्या सभेत काय बोलले होते मोदी?

2014मध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं होतं. त्यावेळी देखील नरेंद्र मोदी यांनी बारामतीतील काका - पुतण्याची सद्दी संपवायला हवी असं आवाहन बारामतीतील जाहीर सभेत केलं होतं. पण, त्यानंतर देखील बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात आपली मतं टाकली होती. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


VIDEO : विखे आणि थोरात एकत्र पण एकमेकांकडे पाहिलेही नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 09:29 PM IST

ताज्या बातम्या