रेशन कार्ड धारकांना फटका; साखर पाच रूपयांनी महागली

रेशन कार्ड धारकांना फटका; साखर पाच रूपयांनी महागली

रेशन कार्डावरील साखरेच्या किमतीत तब्बल 5 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यातच रेशनवर मिळणाऱ्या साखरेचा कोटाही राज्य सरकारने कमी केला आहे.

  • Share this:

19 सप्टेंबर: ऐन दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर रेशन कार्डावरील साखरेच्या किमतीत तब्बल 5 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यातच रेशनवर मिळणाऱ्या साखरेचा कोटाही राज्य सरकारने कमी केला आहे.त्यामुळे सणांच्या तोंडावर सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सध्याच्या नियमांनुसार एका कुटुंबात चार माणसं असतील तर त्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो साखर मिळत होती. आता शासनाने एका रेशन कार्डावर फक्त एकच किलो साखर देण्याचा निर्णय घेतला असल्याने गोरगरिबांच्या तोंडातील गोडवाच गेला आहे. तसंच पूर्वी रेशन कार्डवर मिळणारी साखर साडेतेरा रूपये प्रतिकिलो दराने मिळत होती.नंतर तिचे दर वाढवून 15 रूपये प्रतिकिलो करण्यात आले होते. आता पुन्हा भाववाढ करून साखर 20रूपये किलो या दराने मिळणार आहे.

त्यामुळे याचा फटका गरीबांना आणि सर्वसामान्यांना बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 09:09 AM IST

ताज्या बातम्या