नागपूर:सुरेश भट सभागृहचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

नागपूर:सुरेश भट सभागृहचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

राष्ट्रपती झाल्यानंतर रामनाथ कोविंद पहिल्यांदाच नागपूरात येत आहेत.नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना राष्ट्रपती आज हेलिकॉप्टरने भेट देणार आहेत.

  • Share this:

नागपूर,22 सप्टेंबर: नागपूर जिल्ह्यातील कामठीमधील बौद्ध स्तूप ड्रॅगन पॅलेस परिसरातील विपश्यना केंद्र आणि रेशीमबागेत तयार करण्यात आलेल्या सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज होणार आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर रामनाथ कोविंद पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत.

नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना राष्ट्रपती आज हेलिकॉप्टरने भेट देणार आहेत. सकाळी १०.३० वाजता राष्ट्रपती नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील आणि थेट दिक्षाभूमीला जाऊन तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करतील. त्यानंतर बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेतील. दिक्षाभूमीचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती हेलिकाँप्टरने रामटेकच्या जैन मंदिरात जातील तिथे धर्मगुरूंची भेट घेतील. रामटेकहून राष्ट्रपती कामठीतील ड्रॅगन पॅलेसमध्ये पोचतील आणि तिथे विपश्यना केंद्राचे उद्धाटन करतील.

दुपारी नागपुरात पोचून रेशीमबागेतील सुरेश भट सभागृह  लोकार्पण करतील. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हजर राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2017 08:48 AM IST

ताज्या बातम्या