अमित शहा आज पुणे दौऱ्यावर

अमित शहा यांचं पुण्यात आगमन झाल्यावर निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतील

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2018 10:14 AM IST

अमित शहा आज पुणे दौऱ्यावर

पुणे, 08 जुलै: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्फे आयोजित कार्यक्रमात चाणक्य या विषयावर बोलण्यासाठी भाजपचे चाणक्य अर्थात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज पुण्यात येणार आहेत. संध्याकाळी 5.30 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे देण्यात येणाऱ्या या व्याख्यानाला सुमारे 3 हजारांहून अधिक विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी हजर राहणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठीच खुला असल्यामुळे सर्वसामान्यही या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकतात.

याशिवाय दुपारी 3 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात शहा भाजपाच्या सोशल मीडिया टीममध्ये काम करणाऱ्या सदस्यांसोबत संवाद साधणार आहेत. अमित शहा यांचं पुण्यात आगमन झाल्यावर ते दुपारी 2 च्या सुमारास निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतील. अमित शहा यांच्या दौऱ्याची सांगता रात्री 8 वाजता 'संपर्क से समर्थन' या भाजपच्या अभियाना अंतर्गत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती येथील पुरंदरे वाड्यातील भेटीने होईल.

हेही वाचा: मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी

डोंबिवली स्टेशन झालं जलमय!

उल्हास नदीनं गाठली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 10:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...