गेवराई तालुक्यात तिहेरी अपघात.. पेटत्या कारमध्ये गरोदर महिलेचा होरपळून मृत्यू

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कार आणि स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात गरोदर महिलेचा जळून अक्षरश: कोळसा झाला आहे. कल्याण- विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर मंगळवारी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 02:15 PM IST

गेवराई तालुक्यात तिहेरी अपघात.. पेटत्या कारमध्ये गरोदर महिलेचा होरपळून मृत्यू

बीड, 21 मे- गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कार आणि स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात गरोदर महिलेचा जळून अक्षरश: कोळसा झाला आहे. कल्याण- विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर मंगळवारी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ज्ञानेश्वर जाधव (40,रा. परभणी) हे त्यांच्या कुटुंबीयांसह पुण्यावरून परभणीकडे जात असताना कोळगावजवळ हा अपघात झाला. यात

पत्नी मनीषा जाधव (वय-35) या जागीच जळून खाक झाल्या तर मुलगी लावण्या (14) ही गंभीर भाजली गेली आहे.

लैंगिक शोषण : काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि नगराध्यक्ष अरुण धोटेंना अटक

मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील कोळगाव गावाजवळ तिहेरी अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारमधील एक गरोदर महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

कार आणि स्कॉर्पिओचा अपघात झाला. अपघातग्रस्त गाड्यांवर दुचाकी येऊन धडकली. यावेळी कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये बसलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गरोदर महिलेला बाहेर पडता आले नाही. गाडी पूर्णपणे पेटल्याने या महिलेचा जळून अक्षरश: कोळसा झाला. या अपघातात आणखी एक मुलगी गंभीररित्या भाजली गेली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Loading...

घरकुल घोटाळा: सुरेश जैन, गुलाबराव देवकरांच्या राजकीय भविष्याचा आज फैसला


VIDEO: लोकसभेच्या मतदानानंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...