नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे 3 बळी

Monsoon Update : नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे 3 बळी.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 11:51 AM IST

नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे 3 बळी

नाशिक, 11 जून : राज्यातील अनेक भागात सध्या मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळं नाशिक जिल्ह्यात 2 दिवसामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथे बाळू देवराम सावंत यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर, येवला तालुक्यातील आडगाव येथे चोथवा गावात लताबाई शिवराम आहेर या महिलेच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला. शिवाय, निफाड तालुक्यातील काथरगाव येथे द्वारकाबाई माणिक रणपिस या महिलेचा देखील अंगावर भिंत कोसळल्यानं मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी राज्यात मात्र त्याची प्रतिक्षा कायम आहे. पण, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायाला मिळत आहे. कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात मागील दोन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात विजांचा गडगडाटासह पावसानं हजेरी लावली. काही भागांमध्ये त्यामुळे वीज देखील गेली. सध्या राज्यात भीषण दुष्काळ असून अनेकांचे डोळे हे मान्सूनच्या आगमनाकडे लागून राहिले आहेत.


मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

Loading...

पुढील 2 – 3 दिवसात राज्यात पाऊस

केरळमध्ये दाखल झालेला पाऊस पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात सक्रीय होईल अशी माहिती हवामान विभागानं व्यक्त केली आहे. भीषण दुष्काळ आणि उकाड्यानं हैराण नागरिकांचे डोळे आता मान्सूनच्या आगमनाकडे लागून राहिले आहेत. धरणांमध्ये असलेला पाणीसाठी देखील आता तळ गाठत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये  पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.


SPECIAL REPORT : जमावाची पोलिसाला गाडीत घुसून मारहाण, डोळाही फोडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 09:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...