News18 Lokmat

सुनील तटकरेंना झटका, शिवसेना नेता करणार 'घरवापसी'

प्रकाश देसाई यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 11:15 AM IST

सुनील तटकरेंना झटका, शिवसेना नेता करणार 'घरवापसी'

रायगड, 17 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रायगडमध्ये धक्का बसला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे रायगडच्या राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंसाठी हा झटका असल्याचं मानलं जात आहे.

प्रकाश देसाई यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण आता राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं प्रकाश देसाई यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश देसाई हे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टी आज पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यावेळी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. आज देखील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महामंत्री सुनील बन्सल, महेंद्रनाथ पांडे, उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव मौर्या देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


Loading...

SPECIAL REPORT: पवारांच्या खेळीने आमदार कर्डिले धर्मसंकटात?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...