BJP-RSS दुतोंडी सापासारखे.. मोदी सरकारने काळ्या पैशावर डल्ला मारला- प्रकाश आंबेडकर

BJP-RSS दुतोंडी सापासारखे.. मोदी सरकारने काळ्या पैशावर डल्ला मारला- प्रकाश आंबेडकर

बहुवंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकार हे चोर व डाकूचे सरकार असून नोटाबंदी करून यांनी सर्वात जास्त काळ्या पैशावर डल्ला मारल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर मनमाड येथील जाहीर सभेत बोलत होते.

  • Share this:

मनमाड, 25 एप्रिल- बहुवंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकार हे चोर व डाकूचे सरकार असून नोटाबंदी करून यांनी सर्वात जास्त काळ्या पैशावर डल्ला मारल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर मनमाड येथील जाहीर सभेत बोलत होते.

आंबेडकर वेळेवर सभास्थळी पोहोचले. ते म्हणाले, नोटबंदी सर्वात मोठा घोटाळा असून त्यातून जनतेची लूट करण्यात आली. पंतप्रधान हे गुजरातचे जास्त कौतुक करतात. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहे की फक्त गुजरातचे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.प्रकाश आंबेडकरांनी नोटाबंदीवरुनही मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले, नोटांवर मालकी ही गव्हर्नरची असते. त्यामुळे पंतप्रधानाना नोटबंदी करण्याचा अधिकार कोणी दिला. याबाबत सुप्रीम कोर्टात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे असून आरएसएस ही अतिरेकी संघटनेसारखी असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.


VIDEO: NCP नगरसेविकेच्या पतीवर कुऱ्हाड, तलवारीनं सपासप वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 01:32 PM IST

ताज्या बातम्या