आरोपांच्या वादळात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने उचललं नवं पाऊल

'आम्ही आमची निवडणुकीची तयारी सुरू केली आहे,' अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 01:15 PM IST

आरोपांच्या वादळात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने उचललं नवं पाऊल

नागपूर, 13 जुलै : 'काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. मात्र आम्ही आमची निवडणुकीची तयारी सुरू केली आहे,' अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला नागपुरातून सुरुवातही करण्यात आली आहे.

वंचित आघाडीकडून लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये इतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांच्याही समावेश असल्याची माहिती वंचित आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र त्यापूर्वी आम्ही विधानसभेच्या संपूर्ण 288 जागांवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचंही अण्णाराव पाटील यांनी म्हटलं आहे.

वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार?

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्याने महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी वंचित ही भाजपचीच बी टीम असल्याचा आरोप केला. असं असलं तरीही काँग्रसने विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे.

'विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. विषय जागांचा नसून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,' अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.

Loading...

'वंचित'वर आरोप

'वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,' असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर केले. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली होती.

'लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे भाजपला 10 मिळाला. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे प्रतिगामी शक्तींचाच फायदा होत आहे. आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर तीच भूमिका घेऊन पुढे चालले आहेत. हा पक्ष आता वंचितांचा राहिला नसून त्यामध्ये आरएसएसच्या लोकांनीच घुसखोरी केली आहे,' असं म्हणत लक्ष्मण मानेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.

Zomato डिलीव्हरी बॉयला रॉडने बेदम मारहाण, हॉटेल मालकाचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 03:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...