आघाडी की 'एकला चलो रे'? विधानसभेसाठी अखेर प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली भूमिका

सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 04:33 PM IST

आघाडी की 'एकला चलो रे'? विधानसभेसाठी अखेर प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली भूमिका

सोलापूर, 6 जून : 'शरद पवार हे आता राष्ट्रीय नेते नसून ते आता केवळ बारामतीचे नेते राहिले आहेत. शरद पवार हे भाजपच्या ट्रॅकमध्ये अडकले आहेत,' असं म्हणत वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. सोलापूरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आता लयास आले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा आम्हीच आता विरोधक झालो आहोत. आम्ही आता विधानसभेची तयारी करत असून विधानसभेला मुख्य राजकीय पक्ष असणार आहोत,' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा वेगळी चूल मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'तेच खरे आरोपी'

'माझ्यावर सुपारी घेतल्याचा ज्यांनी आरोप केला ते काही सिद्ध करू शकले नाही. तेच खरे आरोपी आहेत. आम्हाला लोकांनी स्वीकारलं आहे,' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. सत्तेच्या नादात काँग्रेस राष्ट्रवादीने स्वत:चं विघटन केलं आहे. पुन्हा संघटन उभे करायचे असेल तर दोघांनी वेगवेगळे लढले पाहिजे, असा सल्लाही आंबेडकरांनी दिला आहे.


Loading...

खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...