अशोक चव्हाणांच्या खुल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबडेकरांना आघाडीत येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 03:43 PM IST

अशोक चव्हाणांच्या खुल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 8 जून : लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबडेकरांना आघाडीत येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. याबाबत आता प्रकाश आंबेडकर यांनी न्यूज18 लोकमतसोबत बोलताना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

'काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी आम्ही ऑफर दिली होती. पण काँग्रेसकडून सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. तुम्ही सलग तीन निवडणुकांत हरलेल्या 12 जागा आम्हाला द्या, असं आम्ही त्यांना म्हटलं होतं. पण काँग्रेसनं अनुकुलता दाखवली नाही. त्यानंतर निवडणुकीत आणि आता निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आमच्यावर भाजपची बी टीम असा आरोप होत आहे. त्यामुळे आमच्या आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने या आरोपाबाबत एकदा आपली भूमिका जाहीर करावी,' असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

'विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या ऑफरवर आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत विचारमंथन करू. त्यानंतर आमची या आघाडीबाबतची भूमिका जाहीर करू. पण आम्ही आमचा फायदा असणाराच निर्णय घेऊ,' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आताच विधानसभा निवडणुकीतले आपले पत्ते ओपन करण्यास नकार दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितने बिघडवलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं गणित?

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला असला तरीही या आघाडीने अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचं नुकसान केल्याचं पाहायला मिळालं. कारण तब्बल 8-10 जागांवर वंचितच्या उमेदवारांनी एक लाखापेक्षा जास्त मते घेतली. या मतदारसंघात भाजप आणि आघाडीच्या उमेदवारांच्या मतांतील अंतर हे फार जास्त नसल्याचं दिसतं. त्यामुळे वंचितमुळे झालेल्या मतांच्या विभाजनाचा काँग्रेसला फटका बसल्याचं पाहायला मिळालं.

Loading...


माणसातला देव! जवानांमुळे मिळाले 13 वर्षीय मुलाला उपचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...