S M L

रुपया का घसरला? सांगतायत प्रकाश आंबेडकर

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2018 05:52 PM IST

रुपया का घसरला? सांगतायत प्रकाश आंबेडकर

प्रविण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 08 सप्टेंबर : केंद्र सरकारची उद्योगविरोधी भूमिका आणि ईडी, इन्कम टॅक्स विभागाच्या आकसपूर्व कारवाईच्या भीतीपोटी गेल्या तीन वर्षात देशातील ७५ हजार उद्योगपती कुटुंब परदेशात जाऊन स्थायिक झाले. परदेशात स्थायिक झालेले हे लोक भारतीय रुपये देऊन डॉलर्स घेत असल्यामुळे रुपयाचे अवमूल्यन झाल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दरम्यान, ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही तर देशाजवळचे अत्यल्प परकीय चलनही संपूण जाईल अशी भीतीही भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचीही दखल घेतली.'जर वाघ एकटा असेल तर त्याला जंगलातील शिकारी कुत्रे घेरून हरवतात त्यामुळे हिंदूंनी एकत्र येऊन लढले पाहिजे' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. 'माणसांना माणूस समझा जरी ते विरोधी विचारांचे असतील' अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, विरोधी विचारांच्या व्यक्तींच्या शरीरावर हल्ले करायचे की विचारावर याचा विचारदेखील मोहन भागवत यांनी करावा असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेतील शिकागोत स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. याच परिषदेत मोहन भागवत बोलत होते, त्यात त्यांनी हिदूंनी एकत्र यावं हे सांगण्यासाठी वाघ आणि कुत्र्याचं उदाहरण देत वक्तव्य केलं त्यावर प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

विरोधक विरोधी विचारांचे जरी असले तरी त्यांना माणूस समजा, त्यांना कुत्र्याची उपमा देण्याची गरज नाही असा सल्लाच प्रकाश आंबेडकर यांनी मोहन भागवतांना दिला आहे.

Loading...
Loading...

 

अरे देवा… या अनोख्या विक्रमाची विराटने कल्पनाच केली नसेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2018 05:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close