आमची वेळ आली; प्रकाश आंबेडकरांनी घेतला मोठा निर्णय! Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aghadi

आमची वेळ आली; प्रकाश आंबेडकरांनी घेतला मोठा निर्णय! Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aghadi

एका बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न करत असताना आंबेडकरांनी एक मोठा निर्णय घेतला.

  • Share this:

मुंबई, 14 जून: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत नव्याने तयार झालेल्या वंचित आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काही मतदारसंघात धक्का दिला. तर औरंगाबाद सारख्या मतदारसंघात त्यांनी उमेदवार देखील निवडूण आणला. प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar)) नेतृत्वाखाली तयार झालेली वंचित आघाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न करत असताना आंबेडकरांनी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात वंचित आघाडीमुळे निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलणार आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितला केवळ एकच जागा मिळाली असली तरी त्यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अनेक जागांवर पराभव स्विकारावा लागला आहे. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा मेगाप्लॅन सांगितला. वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहोत. राज्यातील वंचित घटकाचा आम्ही आवाज होऊ. सध्या राज्यात पाणी टंचाई आहे. हाच मुद्दा आम्ही निवडणुकीत उपस्थित करू, कारण विरोधकांना कधीच हा प्रश्न लावून धरता आला नाही. निवडणुकीच्या आधी मतदारांना आमचे व्हिजन सांगू आणि त्याआधारेच मतदान करण्याचे आव्हान करू. इतकच नव्हे तर लवकरच वंचित आघाडी संपूर्ण देशभरात विस्तार करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. आमची वेळ आली आहे, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.

मुद्यांच्या आधारे आम्ही आज देखील आघाडी करण्यास तयार आहोत. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि आता देखील काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न स्वत:ला वाचवण्याचा होता. अनेक वृत्तपत्रात वंचित सोबतच्या आघाडी करण्यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पण माझ्याशी कोणीही संपर्क केला नाही. जर त्यांनी (काँग्रेस-राष्ट्रवादी) स्वत:च्या चूकांपासून शिकण्याची तयारी दाखवली आणि पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली तर वंचित आघाडी त्याच्यासोबत जाण्याचा विचार करू शकते.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रा सारख्या राज्यात आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवताना 14 टक्के मते मिळवली. हे एक मोठे यश असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. आम्ही सत्ता मिळवण्याच्या शर्यतीत नाही आहोत. केवळ विजय मिळवणे हा एकमेवर हेतू नाही. आम्ही वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाचा विचार करत असल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत वंचितने अवास्तव जागा मागितल्यामुळे आघाडी होऊ शकली नाही असा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला होता. हा आरोप आंबेडकरांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षांना स्वत:ला वाचवायचे होते. निवडणुकीच्या आधी अनेक नेत्यांना विविध खटल्यांमध्ये अडकवण्यात आले होते. भाजपने काँग्रेससह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी विविध खटल्यांमध्ये फसवले होते. त्यामुळेच आघाडी होऊ शकली नाही असे त्यांनी सांगितले.


VIDEO : व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची उदयनराजेंकडून नक्कल, दाखवला आपला मोबाईल!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 04:37 PM IST

ताज्या बातम्या