S M L

नरसंहाराची भाषा मानणारे मोहन भागवत लोकांना फसवतायत - आंबेडकर

मोहन भागवत यांनी पुन्हा लोकांना फसवण्याचा आणि आम्ही बदललो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भागवतांवर तोफ डागली आहे.

Updated On: Sep 20, 2018 05:24 PM IST

नरसंहाराची भाषा मानणारे मोहन भागवत लोकांना फसवतायत - आंबेडकर

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 20 सप्टेंबर : मोहन भागवत यांनी पुन्हा लोकांना फसवण्याचा आणि आम्ही बदललो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत  भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भागवतांवर तोफ डागली आहे. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यात ते बोलत होते.

माझ्याकडे एक पुस्तक आहे. त्यात संघाचं गॉस्पेल आहे. ते संघाच्या शिबिरात आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये वाचायला दिलं जातं. 'We or our nation to decide' असं पुस्तकाचं नाव आहे. या देशात हिंदू हा राष्ट्रीय धर्म असून इतर धर्मांनी दुय्यम भूमिका स्वीकारावी असं या पुस्तकात लिहण्यात आली आहे. तर इतरांना किती दिवस या देशात ठेवावं याचा निर्णय हिंदुंनी घ्यावा आणि जे बाहेर जाणार नाहीत त्यांचा नरसंहार केला जाईल अशी भाषा या पुस्तकात लिहण्यात आली असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.या पुस्तकातील भागवतांच्या नव्या थिएरीचा आम्ही निषेध करतो. त्यांनी संविधानाची तत्वं मानलेली नाहीयेत तर त्यांना गोळवलकर यांचे विचार मान्य आहेत असं म्हणत आंबेडकरांनी भागवतांच्या विचारांवर टीका केली आहे.

हेही वाचा: आम्ही MIM सोबत राज्यात निवडणुका लढवणार, काँग्रेससाठी दरवाजे खुले - प्रकाश आंबेडकर

आम्ही सुपेरियर आहोत अशी यांची भूमिका आहे. ते इथल्या कोणत्याही कायद्याला मानत नाहीत. साडेचार जिल्ह्याच्या जम्मू काश्मीरमध्ये देखील यांची भूमिका लोकांना मान्य नाहीये. २६ जुलै १९४९ मध्ये गोळवलकर आणि सरदार पटेल यांच्यात करार झाला होता, त्यात भारताचं संविधान, झेंडा, स्वातंत्र्यदिन, राष्ट्रगीत संघानं मान्य केलं. पण त्यांना हे मनापासून मान्य आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं अस आवाहन यावेळी आंबेडकरांनी भागवतांना दिलं.

Loading...
Loading...

लोकांना पाडण्यात रस, उभारण्यात नाही. संघाच्या कार्यकर्त्यांविरोधात बॅकलॅश येऊ नये याकरता हा प्रयत्न असल्यांचं आंबेडकर म्हणाले आहेत. तर आम्ही MIM सोबतच राज्यात निवडणुका लढवणार अशी घोषणा अखेर भारिप-बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काँग्रेससाठी आजही दरवाजे खुले आहेत. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार असणार असं म्हणत त्यांनी भाजप विरोधात काँग्रेस महाआघाडी पांठिबा दिला आहे.

VIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 01:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close