'ते' ट्विटर खाते आणि ट्वीट माझे नाहीच, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 01:06 PM IST

'ते' ट्विटर खाते आणि ट्वीट माझे नाहीच,  प्रकाश आंबेडकर यांचा दावा

मुंबई,26 मे-'काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.', असे ट्वीट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले होते. हे ट्वीट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


दुसरीकडे, 'ते' ट्विटर  खाते आणि ट्वीट माझे नाहीच, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अशा कोणत्याही स्वरुपाचे ट्वीट आपण केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेससोबत समसमान पातळी चर्चा याबाबत तूर्तास काहीच भूमिका नाही. वंचित बहुजन आघाडीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात चर्चा करुन पुढील भूमिका घेतली जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस आम्हाला भाजपची 'बी टीम' समजते..

काँग्रेस आम्हाला भाजपची 'बी टीम' समजते. मुस्लिम समाजात फतवे निघाले म्हणून आम्हाला मुस्लिम मते कमी मिळाली.मुस्लिम मौलानांनी काँग्रेसच्या बोलण्यावरून फतवे काढल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितले.औरंगाबादेत एमआयएमचे इम्तिहाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. ते मुस्लिम उमेदवार होते. बहुजन समाजाने त्यांना मदत केली म्हणून ते खासदार झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.

Loading...

विधानसभेत आम्ही MIM सोबतच

विधानसभेत आम्ही एमआयएमला सोबत घेऊन लढणार आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला नक्की याचा फायदा होईल, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.

संजीव पुनाळेकरांच्या अटेकवर काय म्हणाले आंबेडकर?

पुनाळकरांची अटक ही जहाल हिंदुत्ववादी संघटनांना मोदी सरकारने दिलेला इशारा आहे. आजवर ही कारवाई का झाली नाही याचे उत्तर दोन्ही सरकारने द्यावे, यापुढे मोदीविरुद्ध जहाल हिंदुत्ववादी संघटना असा संघर्ष सुरु होईल, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी टीका केली.


VIDEO : आंबेडकरांची हीच 'ती' खेळी, ज्याने विधानसभेचे दार होणार मोकळे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 01:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...