आमचं सरकार आलं की संभाजी भिडे जेलमध्ये : प्रकाश आंबेडकर

वढू गावचे सरपंच उलटतपासणीला गैरहजर राहिले, तर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची साक्ष पूर्ण झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2018 02:40 PM IST

आमचं सरकार आलं की संभाजी भिडे जेलमध्ये : प्रकाश आंबेडकर

पुणे, 13 नोव्हेंबर : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पुणे कोर्टात आज (मंगळवारी) सुनावणी झाली. यावेळी वढू गावचे सरपंच उलटतपासणीला गैरहजर राहिले, तर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची साक्ष पूर्ण झाली आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबरपर्यंत मुख्यमंत्री आहेत. तो पर्यंत काय करायचं दे करून घेऊदेत. पुढच्या वेळी आमचं सरकार येईल. आम्ही संभाजी भिडेंना नक्कीच तुरूंगात पाठवू, असा इशारा सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काल (सोमवार) प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.

दरम्यान, आज पुणे कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी पाचही गावचे ग्रामसेवक, आयबी अधिकारी, सामाजिक न्यायमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना साक्षीला बोलवण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. 31 डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेपासून 1 जानेवारीच्या हिंसाचारापर्यंत घटना कशा घडल्या आणि त्याची पार्श्वभूमी काय होती, हे आंबेडकरांनी आयोगासमोर मांडलं.

सुनावणीत काल काय झालं होतं?

दुसऱ्या टप्प्याच्या सुनावणीला सोमवारी सुरुवात झाली. त्यावेळी दाभाडे नावाच्या व्यक्तीची आयोगासमोर साक्ष आणि उलटतपासणी करण्यात आली. हिंसाचाराच्या दरम्यान नेमकं काय झालं, याची माहिती दाभाडे यांनी दिली. मिलिंद एकबोटे आणि धनंजय देसाई यांच्या संदर्भाने ही साक्ष होती. त्यामध्ये आपण या दोघांनाही ओळखत नसल्याचं दाभाडे यांनी सांगितलं.

Loading...


VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...