‘राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवून सत्ता मिळवण्याचा मोदींचा डाव’

‘राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवून सत्ता मिळवण्याचा मोदींचा डाव’

‘केंद्रातील भाजप सरकारचा प्रवास हा विकासाच्या मुद्यावरून अयोध्येपर्यंत येऊन ठेपला आहे. यामुळे मित्रपक्षाच्या माध्यमातून राम मंदिर बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला जातोय.'

  • Share this:

पुणे, 27 नोव्हेंबर : ‘राम मंदिराच्या मुद्यावर दंगल घडवायची आणि समाजात भय निर्माण करायचे. त्यातून पुन्हा सत्ता मिळवायची, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न सुरू आहे,’ असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

‘केंद्रातील भाजप सरकारचा प्रवास हा विकासाच्या मुद्यावरून अयोध्येपर्यंत येऊन ठेपला आहे. यामुळे मित्रपक्षाच्या माध्यमातून राम मंदिर बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला जातोय. याच मुद्यावर दंगल घडवायची आणि त्याआधारे पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे,’ असा आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप आणि असदुद्दीन ओवेसी एमआयएम यांच्या वंचित बहुजन आघाडीची पुण्यामध्ये सभा झाली. या सभेत आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं.

'सहा महिन्यात सिंचन गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू, अशी घोषणा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता आरोपी कोण आहे, त्याचे नावही सांगितले जात नाही. सरकार नाव जाहीर का करत नाही,' असा सवाल करत आंबेडकर यांनी फडणवीस सरकारलाही कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.


VIDEO: मुंबईकरांना मिळणाऱ्या दुधात होतेय भेसळ, एफडीएने केली धडक कारवाई


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 08:34 AM IST

ताज्या बातम्या