नरेंद्र मोदी दहावी नापास, त्यांची डिग्री बोगस; प्रकाश आंबेडकरांनी केला प्रहार

नरेंद्र मोदी दहावी नापास, त्यांची डिग्री बोगस; प्रकाश आंबेडकरांनी केला प्रहार

साध्वी प्रज्ञासिंह ही देखील अजमल कसाब याच्यासारखी टेररीस्ट आहे. तिला मोदींनी उमेदवारी दिली. यावर मोदी बोलत नाहीत, भागवत बोलत नाहीत. पोलिसांकडे नाहीत ती शस्त्र RSS कडे आहेत. कारण RSS ही टेररीस्ट संघटना असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकरांनी केला.

  • Share this:

कुडाळ (सिंधुदुर्ग), 20 एप्रिल- नेते, उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदार सर्वच रखरखत्या उन्हात.. हे चित्र होतं वंचित बहुजन आघाडीच्या कुडाळमध्ये झालेल्या सभेचं.. ॲड प्रकाश आंबेडकरांच्या या रणरणत्या उन्हातल्या सभेला  उपस्थिती कमी असली तरी आंबेडकरांचे भाषण ऐकायला मात्र सगळेच उत्सूक होते. मग लोकांनी स्वत: रिकाम्या खूर्च्या आपल्यासोबत घेत बसण्याची व्यवस्था बदलली आणि माहोल तयार झाला. स्वत: प्रकाश आंबेडकरांनीही  कुठलही छत नसलेल्या मंचावर भर उन्हातच उभे राहून लोकांशी संवाद साधला.

अपेक्षेप्रमाणे या सभेतही प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना टार्गेट केले.

नरेंद्र मोदी दहावी नापास आहेत. त्यांची डिग्री बोगस आहे. साध्वी प्रज्ञासिंह ही देखील अजमल कसाब याच्यासारखी टेररीस्ट आहे. तिला मोदींनी उमेदवारी दिली. यावर मोदी बोलत नाहीत, भागवत बोलत नाहीत. पोलिसांकडे नाहीत ती शस्त्र RSS कडे आहेत. कारण RSS ही टेररीस्ट संघटना असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकरांनी केला. शहीद हेमंच   साध्वीवर कारवाई व्हावी, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या