प्रकाश आंबेडकरांनी केली पाच उमेदवारांची घोषणा, काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

प्रकाश आंबेडकरांनी केली पाच उमेदवारांची घोषणा, काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

काँग्रेस राष्ट्रवादीने चर्चेला आणखी उशीर लावला तर इतरही उमेदवार घोषीत करू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर 12 फेब्रुवारी : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये चर्चेचा घोळ सुरू आहे. असं असतानाच प्रकाश आंबेडकरांनी आपल्या आघाडीच्या पाच उमेदवारांची घोषणा केलीय. कोल्हापूरमध्ये मंगळवारी झालेल्या सभेत त्यांनी ही घोषणा केली. काँग्रेस राष्ट्रवादीने चर्चेला आणखी उशीर लावला तर इतरही उमेदवार घोषीत करू अशी घोषणाही त्यांनी केली.


प्रकाश आंबेडकर आणि असाद्दुदीन ओवेसी यांची आघाडी आहे. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र जागांवरून अडल्याने आंबेडकरांनी त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.


असे आहेत वंचित आघाडीचे उमेदवार


सातारा - सहदेव आयवळे

माढा - विजय मोरे

सांगली - जयसिंग शेंडगे

बारामती - नवनाथ पडळकर

पुणे - विठ्ठल सातव


सर्व जागा लढवणार


या आधी 3 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवणार आहे अशी  घोषणा केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापणा केली आहे. ही आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजपविरोधातील मतांमध्ये यामुळे विभागणी होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.


काय आहे आंबेडकरांची मागणी?


'काँग्रेसकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आजवर आला नसून जोवर आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत जागांची चर्चा होणार नाही' असं भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. तसंच 'काँग्रेस जर 12 जागा देणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी राज्यातील 48 जागांवर तयारी पूर्ण झाली असून आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोर जाऊ,' असा इशाराही आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला होता.


शिर्डीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'चार किंवा सहा जागा अशी आमची मागणी फक्त प्रसार माध्यमात सुरू असून जागा विषयी आतापर्यंत आमच्यात कुठलीच चर्चा नाही. मात्र, काँग्रेस तीन वेळा ज्या लोकसभा निवडणुकीत जागा हरल्या त्या जागांची आमची मागणी असून कोणत्या 12 जागा द्यायच्या त्या काँग्रेसनेच ठरवावे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 08:19 PM IST

ताज्या बातम्या