S M L

MIM सोबत निवडणुका लढवणार, काँग्रेससाठी दरवाजे खुले - प्रकाश आंबेडकर

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2018 05:22 PM IST

MIM सोबत निवडणुका लढवणार, काँग्रेससाठी दरवाजे खुले - प्रकाश आंबेडकर

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 20 सप्टेंबर : आम्ही MIM सोबतच राज्यात निवडणुका लढवणार अशी घोषणा अखेर भारिप-बहुजन महासंघाचे  अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काँग्रेससाठी आजही दरवाजे खुले आहेत. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. असं म्हणत त्यांनी भाजप विरोधात काँग्रेस महाआघाडी पांठिबा दिला आहे. काँग्रेसशी युती झाली तरी आम्ही MIM ला सोडणार नाही असं त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.

शरद पवार १०० टक्के सेक्युलर आहेत पण त्यांचा पक्ष तसा नाही. त्यांच्या पक्षात भिडेंची पिलावळ आहे. त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादीसोबत जाणं मंजूर नाही. असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. परिस्थितीनुसार काँग्रेससोबतच आघाडी केली पाहिजे असं आम्हाला वाटतं पण काँग्रेस चर्चा करत नसल्याचंही आंबेडकर म्हणाले आहेत. मौलाना नजीम सिद्दीकी हे आमचे अंपायर आहेत. मला काँग्रेस नेते फोन करतात आमच्यात अद्याप चर्चा होत नाहीये अशी खंत आंबेडकरांना व्यक्त केली आहे.MIMशी आमची युती हे ऐकून सगळ्यात जास्त चटका शिवसेनेला बसलाय. शिवसेना भाजपनं वंचित बहुजनांना वापरल्याशिवाय काहीच केलं नाही. गेल्या ४० वर्षात माझ्यावर कधी अग्रलेख लिहिला गेला नाही, तो गेल्या १५ दिवसात लिहिला गेला अशी म्हणत त्यांनी शिनसेनेवरही टीका केली आहे. उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार ? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी काँग्रेसचा खेळ बिघडवणार?

एमआयएमचा जोर वाढतोय?

Loading...
Loading...

गेल्या काही वर्षात एमआयएमचा महाराष्ट्रात मुस्लिम बहुल भागात प्रभाव वाढतो आहे. याच बळावर पक्षाचे मागच्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आलेत. तर औरंगाबाद महापालिकेत सध्या एमआयएमचे 24 सदस्य आहेत. आक्रमक भाषा आणि एकाच समाजापुरतं राजकारण यामुळं एमआयएमवर कायम टीका होते असते. एमआयएम विखारी राजकारण करतं असही आरोप होत असतो. मात्र असं असलं तरी मुस्लीम तरूणांमध्ये एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं आकर्षण आहे.

प्रकाश आंबेडकरांचा 'आवाज' वाढला

1990 च्या दशकात प्रकाश आंबेडकरांनी विविध पक्षांची मोट बांधून तयार केलेला भारिप-बहुजन महासंघाचा 'अकोला पॅटर्न' महाराष्ट्रात चांगलाच गाजला. नंतर अमरावती आणि किनवट मध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं. पण हे फक्त प्रयोगच राहिले पुढे राजकारणावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही आणि प्रकाश आंबेडकरांचीही ताकद मर्यादीतच राहिली. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी पुकारलेला बंद यशस्वी राहिला. सत्तेत असल्याने रामदास आठवले आक्रमक भूमिका घेऊ शकले नाही. ती जागा आंबेडकरांनी भरून काढत सरकारवर आक्रम टीका करत आपलं स्थान पक्क केलं. त्यामुळं त्याची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागली.

या ६ गोष्टी पाकिटात कधीच ठेवू नका, पैसे खर्च होतील

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 01:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close