प्रत्येक दिवसाला 34 जणांपेक्षा जास्त जीव घेणारा हा नवा 'यमदूत'

प्रत्येक दिवसाला 34 जणांपेक्षा जास्त जीव घेणारा हा नवा 'यमदूत'

याआधी मोठ्या आजाराने, नैसर्गित आपत्तींमुळे, बॉम्ब हल्ला, चेंगराचेंगरी, आणि पावसात अनेकांचा बळी गेलाय. मात्र आता नवा यमदूत उदयाला आलाय.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : याआधी मोठ्या आजाराने, नैसर्गित आपत्तींमुळे, बॉम्ब हल्ला, चेंगराचेंगरी, आणि पावसात अनेकांचा बळी गेलाय. मात्र आता नवा यमदूत उदयाला आलाय. तो म्हणजे 'खड्डे'. राज्यात वर्षभरात खड्ड्यांमुळे तब्बल 12 हजारांहून अधिक जणांचा बळी गेलाय. राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. विशेष म्हणजे मृतांमध्ये पादचारी, आणि दुचाकीस्वारांचं प्रमाण 70 टक्के आहे. त्यामुळे आपला जीव आता या खड्ड्यांच्या हातात आहे असं म्हणायला हरकत नाही.

राज्यात रस्ते अपघातात वर्षभरात 12 हजार 264 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य रस्ते सुरक्षा परिषदेकगी बैठक परिवहन मंत्री यांनी ही माहिती समोर आणली आहे. राज्यात जाने 2017 ते डिसेंबर 2017 दरम्यान 35 हजार अपघातात झालेत. अपघातात मृत्यू झालेल्यामध्ये सायकल, मोटारसायकल आणि पादचारी मृत्यूचं प्रमाण 70 टक्के आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना कोण्यात्याही नियमांचं उल्लंघन करू नका. वाहनं हळू चालवा. आपला जीव हा काही बाजारचा भाजीपाला नाही आहे, त्यामुळे कोणताही अपघात होण्यापेक्षा स्वत:ची काळजी घ्या.

- जानेवारी 2017 ते डिसेंम्बर 2017 दरम्यान 35 हजार 853 अपघात झाले

- 12264 जणांचा मृत्यू

- 32 हजार 128 जखमी झाले

Loading...

-  66 टक्के पादचारी, सायकलस्वार, दुचाकी वाहन अपघात

- एकूण अपघातात 24 ते 45 वयाचे सर्वाधिक

- 937 अंबुलन्स , 108 ट्रामा केअर सेंटर कार्यरत

तासागणिक जीव घेणारा 'यमदूत'

- 2017 मध्ये खड्ड्यांमुळं राज्यभरात  35 हजार 853 अपघात

- रस्ते अपघातात तब्बल 12 हजार 264 जणांचा मृत्यू

- खड्ड्यांमुळं दिवसाला जवळपास 34 जणांचा मृत्यू

- तासाला 1 पेक्षा अधिक नागरिकाचा मृत्यू

- अपघातामध्ये 24 ते 45 वयोगटाचे नागरिक सर्वाधिक

- 97    रस्ते सुरक्षा परिषद

- राज्यात 1324 ब्लॅक स्पॉट

 

VIDEO : गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2018 09:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...