डाकिया डाक नही लाया, ग्रामीण भागातली टपालसेवा ठप्प,पोस्टमन संपावर

डाकिया डाक नही लाया, ग्रामीण भागातली टपालसेवा ठप्प,पोस्टमन संपावर

मागचे 7 दिवस पोस्टमन संपावर असल्याने टपालसेवा बंद आहे. सेवेत कायम करण्यात यावं, सातवा वेतन आणि पेन्शन लागू करण्यात यावं यासाठी पोस्टमन संपावर गेले आहेत.

  • Share this:

23 आॅगस्ट : ग्रामीण भागातली टपालसेवा पूर्ण ठप्प झाली आहे. मागचे 7 दिवस पोस्टमन संपावर असल्याने टपालसेवा बंद आहे. सेवेत कायम करण्यात यावं, सातवा वेतन आणि पेन्शन लागू करण्यात यावं यासाठी पोस्टमन संपावर गेले आहेत. याचा फटका नागरिकांना बसतो आहे. वीज बिल भरण्यापासून सगळी कामं रखडली आहेत.

संपाला 7 दिवस उलटून गेले तरी सरकार लक्ष देत नाही म्हटल्यावर पोस्टमननी मोर्चा काढला होता. ग्रामीण भागातील पोस्टमनला १२-१२ तास काम करून देखील महिन्याला ५ ते १२ हजार रुपयांपर्यंत वेतन दिलं जातं. २५ ते ३० वर्षे काम  केलेल्या पोस्टमनना पेन्शनदेखील मिळत नाही. सेवानिवृत्त झाल्यावर शासनाच्या कोणत्याही सवलती देखील मिळत नाहीत त्यामुळे पोस्टमन संपावर गेले आहेत.

या संपामुळे पोस्ट ऑफीसात टपालाचे गठ्ठेच्या गठ्ठे पडून आहेत. शहरात कदाचित पोस्टमनच्या संपामुळे काय असुविधा होऊ शकते याची कल्पना नसेल. कारण शहरात हल्ली कोण कोणाला पत्र पाठवत नाही. सोशल मीडिया, अॅप्सद्वारे कम्युनिकेशन होत असतं. आॅनलाईन कामं होतात. पण गावागावात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे पोस्टमनच्या संपाचा फटका ग्रामीण भागांमध्ये जास्त बसलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 01:06 PM IST

ताज्या बातम्या