केसरकरांनी दहा लाख देऊन विमान उतरवलं, राणेंचा केसरकरांवर आरोप

केसरकरांनी दहा लाख देऊन विमान उतरवलं, राणेंचा केसरकरांवर आरोप

सिंधुदुर्ग विमानतळावर 'राजकीय' विमानांची टक्कर, राणे आणि केसरकरांमध्ये कलगीतुरा

  • Share this:

दिनेश केळुसकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 12 सप्टेंबर : सिंधुदुर्ग विमानतळावर पार पडलेली विमान चाचणी बेकायदेशीर असल्याचा दावा करीत दीपक केसरकरांनी दहा लाख रुपये भरून विमान उतरवण्याचा अट्टाहास केला असल्याचा आरोप नारायण राणेंनी केलाय. तर राणे चांगल्या कामात विघ्न आणत असल्याचं म्हणत  येत्या 12 डिसेंबरला पहिलं चार्टर्ड विमान याच विमानतळावर उतरणार असल्यामुळे ही चाचणी घेण्यात आली असल्याच केसरकरांनी स्पष्ट केलय.

सिंधुदुर्ग विमानतळावर पहिल्यांदाच बारा सीटर खाजगी  विमान यशस्वी पणे उतरलं आणि सिंधुदुर्गवासियांच स्वप्न सत्यात आल्याचा प्रत्यय आला. पण या विमान चाचणीच्या मुहुर्तालाच सिंधुदुर्गातल्या दोन राजकीय विमानांची पुन्हा एकदा टक्कर झालीय. ही विमान चाचणीच बेकायदेशीर असल्याच राणे म्हणतायत.

12 सप्टेंबरला विमान उतरणार असल्याच दीपक केसरकरांनी आधीच जाहीर केल होत. पण हे शक्य होणार नाही असा दावा राणेंनी केला होता. तर केसरकरांनी विमानातून गणपती आणण्याची शक्कल लढवत किमान परवानग्या मिळवल्या आणि विमान उतरवलं.  त्यामुळे राणे उगीचच राजकारण आणत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

जे लोक कागदी विमान उडवा बारा तारीखला, असं म्हणत होते त्यांनी येऊन पहावं की हे कागदी आहे की खर आहे. यात कुणी राजकारण करू नये. मी कधी राजकारण केलेलं नाही. तारखा जाहीर केल्या होत्या सुरेश प्रभूंनी. मी फक्त त्या तारखांवर काम केलं. हे बघणं पालकमंत्री म्हणून माझं काम आहे ते मी केलं आणि 12 नोव्हेंबरच्या आत प्रवासी वाहतूक कशी सुरू करता येईल हे पाहू असं केसरकर म्हणाले आहेत.

विघ्न आणणारे खूप असतात पण विघ्नहर्ताच स्वत आलेला आहे. सिंधुदुर्ग विमानतळाची धावपट्टी पूर्ण झालेली असली तरी अजून ATC टॉवरच काम पूर्ण झालेल नाही. त्यामुळे अद्यापही हे विमानतळ भारत सरकारकडे हस्तांतरीत झालेलं नाही. ते डिसेंबरनंतरच होणार असलं तरी पहिलं विमान उतरवण्याचं श्रेय केसरकरांनी म्हणजेच शिवसेनेने  लाटलय.

 

PHOTOS : नागराज मंजुळे,आर्ची-परश्या मनसेच्या चित्रपट सेनेत !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2018 04:15 PM IST

ताज्या बातम्या