दाऊदच्या नात्यातील लग्नात गिरीश महाजनांसह आमदार-पोलिसांची मांदियाळी, वऱ्हाडी आयबीच्या रडारवर

दाऊदचे नातलग असलेल्या नाशकातील बड्या असामीच्या पुतणीच्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या लग्न सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह तीन स्थानिक आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदारांनी हजेरी लावली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 24, 2017 11:15 PM IST

दाऊदच्या नात्यातील लग्नात गिरीश महाजनांसह आमदार-पोलिसांची मांदियाळी, वऱ्हाडी आयबीच्या रडारवर

24 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचं लग्न चांगलच गाजतंय कारण आहे या लग्नाला आयबीनं लावलेली हजेरी. गेल्या आठवड्यात दाऊदशी जवळीक असलेल्या नाशिकमधल्या एका बड्या असामीच्या नातेवाईकाशी लग्न झाले. या लग्नाला केवळ नाशिकमधूनच नव्हेतर मुंबई-पुणे राज्यातील विविध भागातून अनेक बड्या नेत्यांनी, माजी आणि सध्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी दावतला हजेरी लावल्यानं आयबीसह सगळ्या गुप्तचर संस्थांनी भुवया उंचावल्यात.

नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी लग्नासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,सोमनाथ तांबे,संजय देशमुख,मसशेर खान पठाण,मनोज शिंदे,हनुमंत वारे,कांतिलाल चव्हाण,विनोद केदार,विजय लोंढे यांची चौकशी सुरू केलीये.

इतकंच नव्हेतर दाऊदचे नातलग असलेल्या नाशकातील बड्या असामीच्या पुतणीच्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या लग्न सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह तीन स्थानिक आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदारांनी हजेरी लावली.

इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नाची दावत खाणारे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सोमनाथ तांबे यांच्यासह इतर काही पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नाशिकचे पोलीस अायुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी चाैकशी सुरू केली आहे. आयबी या गुप्तचर संस्थेकडूनही या पाेलिसांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2017 10:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...