News18 Lokmat

पोलीस कर्मचाऱ्यानेच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार

योगिराज वाघ या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2017 12:53 PM IST

पोलीस कर्मचाऱ्यानेच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार

अंबरनाथ,17 सप्टेंबर: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात पोलीस खात्याला शरमेने मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे. योगिराज वाघ या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.

याप्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात नराधम पोलिस कर्मचारी योगीराज वाघ याच्या  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस योगीराज वाघ याचे आपल्या मित्राच्या घरी येणं जाणं होतं. याच दरम्यान त्याने मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली होती. योगीराज वाघ या नराधम पोलीस कर्मचाऱ्याने मित्राच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवला.तसंच पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.  आरोपी हा पोलिस कर्मचारी असल्याने आणि आपल्या पतीला आणि मुलाला मारण्याची धमकी दिल्याने पीडित प्रचंड दबावाखाली होती. घरात अचानक काही दिवसांपासून पीडित महिला घरच्यांशी काहीही न बोलता एकलकोंडी झाल्याने पतीने पीडितेला विश्वासात घेतले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. पण अद्याप आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही.

आपण स्वत: पोलीस खात्यात असून आपल्याला पोलीस सहकार्य करत नसल्याची खंत पीडित महिलेच्या पतीने व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...