वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सायकल वारी

आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत 230 किलोमीटरची ही सायकलवारी मुख्य वारीच्या आधी 2 दिवस काढण्यात येणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2017 04:22 PM IST

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सायकल वारी

संदीप राजगोळकर,07 जून : यंदाच्या वारीमध्ये सुरक्षा, अंमलबजावणी, नियोजन यासाठी पोलीस दल सायकल वारी काढणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीय.

दरवर्षी लाखोंच्या संख्येनं वारकरी वारीमध्ये सहभागी होतात. पण अनेक वेळा नियोजनाच्या अभावामुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत 230 किलोमीटरची ही सायकलवारी मुख्य वारीच्या आधी 2 दिवस काढण्यात येणार आहे.

त्या त्या विभागातले पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून वारी मार्गावरच्या सगळ्या उपाययोजनांची पाहणी या सायकल वारीच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती नांगरे पाटील यांनी दिलीय. त्यामुळे यंदा तरी वारकऱ्यांना होणारा त्रास, सुरक्षेबाबतचे उपाय, यांबाबत ठोस अंमलबजावणी होते का हे पहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close