पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

या गाडीची आणि समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअपची सामोरा समोर धडक झाली. हा अपघात येवढा जोरदार होता की त्यात जीपचा चेंदामेंदा झाला

  • Share this:

जेजुरी 16 जुलै : आषाढी वारी चा बंदोबस्त उरकून येत असलेल्या ठाणे शहर पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झालाय. यात पोलीस व्हॅनचा ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय. ही गाडी पंढरपूरवरून येत होती. पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी जवळच्या तक्रारवाडी येथे हा अपघात झाला.  अपघातात व्हॅन  चालक पोलीस कर्मचारी निलेश दत्तात्रय निगडे (रा. गुळुंचे ता पुरंदर ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

रात्री 10  वाजण्याच्या सुमारास पोलीस व्हॅन पंढरपूरवरून ठाण्याकडे जात होती. या गाडीची आणि समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअपची सामोरा समोर धडक झाली. हा अपघात येवढा जोरदार होता की त्यात जीपचा चेंदामेंदा झाला आणि पोलीस व्हॅनचंही मोठं नुकसान झालं.

नागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं

कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू

कारमध्ये गुदमरल्याने दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीनही मुलं एकाच कुटुंबातील असल्याने हा घातपात तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.

‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी तीनही मुलं बेपत्ता झाली होती. एकाच कुटुंबातील असलेल्या या मुलांची शोधमोहिम सुरू होती. मुलं सापडली नाहीत तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. एकाच घरातील मुलं असल्यानं पोलिसांना अपहरणाची शक्यता वाटली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता एका कारच्या काचेवर चिमुकलीचा हात दिसला. त्यात तिनही मुलं सापडली. तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांच्यापैकी दोन मुलांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 04:11 PM IST

ताज्या बातम्या