S M L

बारावीचा पेपर व्हायरल प्रकरणातील डांबून ठेवलेल्या युवकाची माध्यमांच्या दबावानंतर सुटका!

दरम्यान प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीला शाळा प्रशासनानं काही काळासाठी डांबून ठेवलं होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 22, 2018 08:31 AM IST

बारावीचा पेपर व्हायरल प्रकरणातील डांबून ठेवलेल्या युवकाची माध्यमांच्या दबावानंतर सुटका!

22 फेब्रुवारी : बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा धक्कदायक प्रकार सोलापूरमध्ये समोर आला. दरम्यान प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीला शाळा प्रशासनानं काही काळासाठी डांबून ठेवलं होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दशरथ सोनावणे असं त्या व्यक्तीचं नाव असून तो कंडक्टर आहे.

परीक्षा सुरू होऊन तासही लोटला नव्हता, तोच बार्शी तालुक्यातल्या भातंबरे गावातील तांबेवाडीत प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हॉट्सअॅपर व्हायरल झाला. दरम्यान प्रश्नपत्रिका कुणी व्हायरल केली, कोणत्या शाळेतून प्रश्नपत्रिकेला पाय फुटले या संदर्भात सविस्तर तपास करण्याचं स्वारस्य स्थानिक पोलिसांनी दाखवलेलं नाही. प्रश्नपत्रिका व्हायरल होऊ नये म्हणून बोर्डानं कठोर नियम लागू केलेत. पण त्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान ग्रामीण पोलीस प्रशासनाने मात्र यात कोणतीही भूमिका घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे चुकीच्या कामाचा पर्दाफाश करणाऱ्या युवकांवर अशा पध्दतीने दबाव आणला जाणार का हाच खरा सवाल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2018 08:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close