S M L

एल्गार परिषदेप्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी

पुण्यात 31 डिसेंबर 2017ला झालेल्या एल्गार परिषदेप्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी सुरू झाल्यात.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 17, 2018 10:26 AM IST

एल्गार परिषदेप्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी

17 एप्रिल : पुण्यात 31 डिसेंबर 2017ला झालेल्या एल्गार परिषदेप्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी सुरू झाल्यात. नागपूरमधल्या काही कार्यकर्त्यांच्या तर यात सहभागी असलेल्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांच्या घरावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली, आणि 1 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये दलित समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्यानंतर राज्यभर 3 जानेवारी रोजी बंद पाळण्यात आला होता.

या घटनेनंतर 7 जानेवारी 2018 रोजी कबीर कला मंचच्या 4 जण आणि रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात आज पहाटेपासून पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तर मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. तपास काम सुरू आहे. सर्च वॉरंट घेऊन कारवाई सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, दंगल करणाऱ्या एकबोटेंना पकडलं पण संभाजी भिडेंना नाही, त्यामुळे हे सगळं संभाजी भिडेंवर पर्दा टाकण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Loading...
Loading...

जर हिम्मत असेल तर ज्यांनी एल्गार परिषद भरवली त्या पी. व्ही. सावंत यांच्यावरही कारवाई करून दाखवा असा दावा प्रकाश आंबेडकर पोलिसांना केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 10:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close