अकोल्यात पोलीस अधिकाऱ्याने ACBच्या कर्मचाऱ्यांवर झाडली गोळी

अकोल्यात पोलीस अधिकाऱ्याने ACBच्या कर्मचाऱ्यांवर झाडली गोळी

लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्यानंतर पोलीस निरीक्षकाने एसीबी कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

कुंदन जाधव (प्रतिनिधी)

अकोला, 13 जून- लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्यानंतर पोलीस निरीक्षकाने एसीबी कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एसीबीचे कर्मचारी जखमी झाले असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पिंजर पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली. पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर करण्यात आल्या आहेत. नंदकिशोर नागलकर यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. मात्र, त्यानंतरही ते ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नागलकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सुरु असतानी नागलकर यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एसीबीच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. यात सचिन धात्रक हे जखमी झाले असून त्यांच्यावर सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. धात्रक यांच्या उजव्या हाताची करंगळी आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी पिंजर येथे दाखल झाले होते.

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात लज्जास्पद घटना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन नराधमाने बलात्कार केला आहे.

नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 376 कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडीच्या घटनेनंतर अवघ्या तीन दिवसांत अल्पवयीन मुलीवर बलात्काराची ही दुसरी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदी ऐरणीवर आला आहे.


SPECIAL REPORT: मालकाविना डेअरीमध्ये दूध पोहोचवणारा बैल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2019 11:12 AM IST

ताज्या बातम्या