भीषण : पोलिसाने केला सावत्र मुलांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू

संजय हे रिव्हॉल्वर घेऊन त्यांना मारायला धावले. त्यानंतर दोनही मुलं धावत जाऊन बाथरुममध्ये लपून बसली.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 05:36 PM IST

भीषण : पोलिसाने केला सावत्र मुलांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 21 जून :  पोलिसांनी नागरिकांचं रक्षण करणं अपेक्षीत आहे. मात्र नाशिकमधल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच सावत्र मुलांवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याची भीषण घटना घडली. या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झालाय तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय. घरगुती वादातून मुलं आणि वडिलांमध्ये भांडण झालं आणि त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती आहे.

संजय भोये असं त्य पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून नाशिकच्या उपनगर पोलीस स्टेशनमध्ये ते तैनात आहेत. संजय यांचं दुसरं लग्न झालंय. आधीची त्यांना सोनू आणि शुभम अशी दोन मुलं आहेत. संजय आणि या दोन मुलांमध्ये कायम भांडण होत असे अशी माहिती शेजाऱ्यांनी दिलीय. या भांडणांमुळेच त्यांचे संबंध हे तणावाचे होते.

संजय हे जेव्हा आज दुपारी घरी आले तेव्हा त्यांच्यात आणि मुलांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. संजय हे रिव्हॉल्वर घेऊन त्यांना मारायला धावले. त्यानंतर दोनही मुलं धावत जाऊन बाथरुममध्ये लपून बसली. मात्र संजय यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सोनू या मुलाचा मृत्यू झालाय. तर शुभम् गंभीर जखमी आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी संजयला अटक केलीय.

साक्रित संशयावरून खून

चारित्र्याच्या संशयाने पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यात घडली आहे. भारती चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी गोरख चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.

Loading...

भारती हिचा 14 वर्षांपूर्वी गोरख चव्हाण याच्याशी विवाह झाला होता. मात्र, बेरोजगार असलेला गोरख नेहमीच दारू पिऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. भारतीला मारहाणही करत होता. नेहमीच चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व्यसनी नवऱ्याला कंटाळून भारती आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून ती माहेरी राहत होती. दरम्यान, भारती माहेरी अंगणात कपडे धूत असताना चारित्र्याच्या संशयाने पछाडलेला गोरख अचानक तिथे आला. 'तुला आता मारूनच टाकतो, म्हणत गोरखने हातातला मोठा दगड भारतीच्या डोक्यात टाकला. यात भारतीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर गोराखने पळ काढला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: police
First Published: Jun 21, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...