S M L

दारू माफियांनी कामावर असलेल्या पोलिसाला चिरडलं, जागीच मृत्यू

चंद्रपुर जिल्हयात दारुबंदी असल्याने अवैध दारुचा पुरवठा रोखण्यासाठी आज विशेष अभियान सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2018 11:56 AM IST

दारू माफियांनी कामावर असलेल्या पोलिसाला चिरडलं, जागीच मृत्यू

महेश तिवारी, चंद्रपूर, 6 नोव्हेंबर : नागभीड़ पोलीस ठण्याचे प्रभारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना अवैधरित्या दारू वाहून नेणाऱ्या स्कार्पियोने धडक दिली आहे. या धडकेत छत्रपती चिडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रपुर जिल्हयात दारुबंदी असल्याने अवैध दारुचा पुरवठा रोखण्यासाठी आज विशेष अभियान सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.

धडक दिल्यानंतर ही दारू वाहून नेणारी स्कार्पियो घेऊन आरोपी फरार झाले आहेत. आज (मंगळवार) सकाळची ही घटना आहे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिड़े हे पवनी मौशी गावाजवळ नाकाबंदी करत आपले कर्तव्य बजावत होते.

त्यावेळी स्कॉर्पियो गाडीतून दारू घेऊन जाणाऱ्या आरोपींना चिडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी पोलिसांना न जुमानता उपनिरीक्षक चिडे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या छत्रपती चिडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान, चंद्रपुरात दारूबंदी असतानाही अनेक ठिकाणी अवैधरित्या दारू वाहतूक होत असते. यालाच आळा घालण्यासाठी पोलिसांकडून एक विशेष अभियान राबवण्यात येत आहे. परंतु या अभियानादरम्यानच पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांना धडक देण्यापर्यंत मजल गेलेल्या दारूमाफियांमना रोखायचे कसे, हे येणाऱ्या काळात पोलिसांसमोरील मोठं आव्हान असणार आहे.


Loading...

निवडणूक डिपॉजिट म्हणून चक्क 10 हजारांची चिल्लर, अधिकाऱ्यांना फुटला घाम


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2018 11:39 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close