मुळशीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश..दिल्लीतील चार मॉडेल ताब्यात

मुळशीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश..दिल्लीतील चार मॉडेल ताब्यात

हिंजवडी-मुळशी परिसरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कोलते पाटील इस्टेटमधील एका फ्लॅटवर छापा टाकून देहविक्री करणाऱ्या दिल्लीतील चार मॉडेल्सना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 8 जून- हिंजवडी-मुळशी परिसरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कोलते पाटील इस्टेटमधील एका फ्लॅटवर छापा टाकून देहविक्री करणाऱ्या दिल्लीतील चार मॉडेल्सना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, मुळशीतील कोलते पाटील इस्टेटमधील लाईफ रिपब्लिक सोसायटीत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिंजवडी पोलिस स्टेशनच्या उपपोलिस निरीक्षक कविता नागेश रुपनर यांनी सांगितले की, लाईफ रिपब्लिक सोसायटीत दिल्लीतील चार मॉडेल्सना बोलावून त्यांच्याकडून देहविक्री करवून घेण्यात येत असल्याची गोपनिय माहितीच्या आधारावर ही करवाई करण्यात आली. आरोपी आर्यन उर्फ विश्वास बळीराम सावरगावकर ( वय-34, रा. ए. 108, आर.3 बिल्डिंग, कोलते पाटील इस्टेटमधील लाईफ रिपब्लिक सोसायटी), नितीन शरद भालेराव (वय- 25, रा. प्रकाश नगर, पाण्याच्या टाकीजवळ, सराफ लाईन, लातुर), अभय सज्जनराव शिंदे (वय- 25, रा. शिवाजी चौक, शिवकृपा निवास, लातुर) मयुर गणेश शर्मा (वय-भावनी चौक, आनंद नगर, भोपाळ, मध्य प्रदेश), दिलीप भागिरथ मंडल (वय-24, ए-104, करण अपार्टमेंट, नालासोपारा ईस्ट, वसई पालघर) अशी आरोपींची नावे आहेत.

सर्व आरोपी दलाल आहेत. त्यांनी दिल्लीतील चार मॉडेल्यना पैशाचे आमिष दाखवून देहविक्री करण्यासाठी बोलावले होते. त्यांना ग्राहक मिळवून देऊन त्यांना देहविक्रीसाठी प्रवृत्त करत होते. सर्व आरोपींविरूद्ध पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


SPECIAL REPORT: वसईतील 'या' भन्नाट रिक्षाची का होते आहे चर्चा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या