03 जून : सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं म्हणून पिंपरी पेंढार येथील 60 शेतकऱ्यांवर आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.काल मध्यरात्री अप्पर पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी शेतकऱ्यांना 'भेकड' हा शब्द प्रयोग वापरल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.त्यानंतर रात्री आणि आज सकाळी 60 शेतकऱ्यांची पोलीस आणि एसआरपी पथकाने धरपकड केली आहे.
या सर्वांना तळेगाव कोर्टात लोकांना नेलं आहे. बेकायदेशीर जमाव जमाव जमवून दूध गाडी आणि शेती मालाचं नुकसान केल्याचा आरोप आहे.
ओतूर परिसरातील शेतकारीही आक्रमक झाले असून या ठिकाणीही काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलं म्हणून पिंपरी पेंढारच्या 59 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा