सोलापुरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये तुफान चकमक, 1 ठार

या चकमकीमध्ये पोलिसांनी 1 दरोडेखोराला जखमी केलं तर इतर 5 जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 09:11 AM IST

सोलापुरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये तुफान चकमक, 1 ठार

सोलापूर, 10 फेब्रुवारी : सोलापूरच्या तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उळे गावानजीक पोलीस आणि दरोडेखोरात तुफान चकमक झाली. तब्बल 6 दरोडेखोर आणि 3 पोलिसांमध्ये ही चकमक सुरू होती. यात एक दरोडेखोर ठार झाला आहे.

मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरी करत असलेल्या 6 जणांना पोलिसांनी घेरलं. त्यानंतर त्यांच्यामध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीमध्ये पोलिसांनी 1 दरोडेखोराला जखमी केलं तर इतर 5 जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

पण यानंतर पोलिसांनी पळून जाणाऱ्या त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. या गोळीबारात एका दरोडेखोराला गोळी लागून तो ठार झाला आहे. तर पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरोडेखोरांकडून पोलीस अधिकाऱ्याच्या खासगी गाडीवर दगडफेकदेखील करण्यात आली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ही चकमक झाली. दरम्यान, यात जखमी झालेल्या पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

तर सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या प्रकारामध्ये दरोडेखोरांनी पोलिसांना तलवारीने हल्ला केल्याची प्राथमिक माहितीदेखील समोर आलं आहे. त्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे.

Loading...


'6 हजार कशाला, शेतीला हमीभाव द्या', छोट्या घनश्यामच्या तोंडून ऐका शेतकऱ्यांची व्यथा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2019 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...