29 जुलै : 'माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान'' अशी जाहिरात करणाऱ्या पु ना गाडगीळ ज्वेलर्सला महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. पुण्यात पु ना गाडगीळच्या या जाहिरातीवर महिलांना नाराजी व्यक्त केली असून सोशलमीडियावर याची चर्चा सुरू आहे.
पुण्यातील प्रसिद्ध पु. ना.गाडगीळ ज्वेलर्सतर्फे मंगळसूत्र महोत्सव घेण्यात येतोय. २४ जुलै ते २४ ऑगस्ट असा हा महोत्सव आहे. मात्र या महोत्सवाची जाहिरात करताना ''माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान '' असं म्हटलं गेलंय.
खरंतर महिलांना मंगळसूत्र हा संस्कृतीचा भाग आणि दागिना म्हणून मान्य आहे. पण मंगळसूत्र हा त्यांचा स्वाभिमान नक्कीच नाही, आत्मविश्वास हा स्त्रीचा स्वाभिमान असल्याचं मतं महिलांनी व्यक्त केलंय.
सोशल मीडियावरही पु.ना.गाडगीळच्या जाहिरातीवर टीका होतेय. परंतु, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक पराग गाडगीळ यांनी मात्र जाहिरातीतील उल्लेखाचा समर्थन केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा