S M L

'तुकाराम मुंढे हाय हाय', पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्याच्या घोषणा

कामचुकार कर्मचाऱ्यांना नारळ देणे, ठेकेदारांच्या मनमानीला चाप, आधुनिक तंत्रज्ञान वापरून पीएमपीएलची वाढवलेली कार्यक्षमता ही मुंढे यांच्या कार्यकाळातील वैशिष्ट्ये

Sachin Salve | Updated On: Feb 8, 2018 04:55 PM IST

'तुकाराम मुंढे हाय हाय', पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्याच्या घोषणा

अद्वैत मेहता,पुणे

08 फेब्रुवारी :पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. पण अखेरच्या दिवशीही नाराज झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी मुंडे यांच्या बदलीनंतर आनंद व्यक्त करत 'मुंडे हाय हाय'च्या घोषणा दिल्या. पण पीएमपीएमएल प्रवाशांनी मात्र मुंढे यांच्या सारखे चांगले स्वच्छ अधिकारी राजकीय व्यवस्थेला चालत नाहीत का ?, अशा परखड सवाल केलाय.

जेमतेम 11 महिन्यांच्या पीएमपीएल अध्यक्षपदाची तुकाराम मुंढे यांची कारकीर्द धडाकेबाज निर्णय,राजकारणी आणि शिस्तप्रियता न आवडणारे कर्मचारी यांचा मुलाहिजा न बाळगणे या शैलीमुळे गाजली. कामचुकार कर्मचाऱ्यांना नारळ देणे, ठेकेदारांच्या मनमानीला चाप, आधुनिक तंत्रज्ञान वापरून पीएमपीएलची वाढवलेली कार्यक्षमता ही मुंढे यांच्या कार्यकाळातील वैशिष्ट्ये. मुंढे याबाबत समाधानी आहेत.

वारंवार होणाऱ्या बदल्या हा कामाचा भाग आहे असं मानणाऱ्या मुंढे यांच्या बदलीमुळे दुखावलेल्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत मुंडे हाय हाय च्या घोषणा दिल्या. मुंडे यांनी मनमानी करत पीएमपीएमएलचा तोटा वाढवला असा आरोप ही केला. मात्र प्रवास करणाराऱ्या प्रवाशांनी मुंढे यांची नुसती पाठराखण केली नाही तर पाठ थोपटली आणि भ्रष्ट,अकार्यक्षम राजकीय व्यवस्थेला मुंढे यांच्या सारखी माणसे चालत नाहीत असं परखड मत मांडले.

तुकाराम मुंढे यांना पीएमपीएमएलमध्ये काम करताना धमकी देणारी 7 पत्रेही आली पण या पत्रामुळे न खचता मुंढे हे नाशिक शहर हे liveble आणि lovable करण्याची मनीषा बाळगून आव्हान हे संधी मानत रवाना झालेत.

Loading...
Loading...

आता राज ठाकरे यांच्या मनसेच्या ताब्यातील नाशिक मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गोदकाठच्या नाशिककडे मुंढे नावाचं वादळ नवी मुंबई पुणे मार्गे सरकलंय...त्यांना शुभेच्छा..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 04:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close