S M L

तुकाराम मुंढे यांचे बहुतांश निर्णय पीएमपी संचालक मंडळाकडून रद्दबातल

तुकाराम मुंढे यांची बदली होऊन आठवडा उलटत नाही तोच पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने त्यांचे सर्व निर्णय रद्दबातल ठरवलेत

Chandrakant Funde | Updated On: Feb 14, 2018 02:03 PM IST

तुकाराम मुंढे यांचे बहुतांश निर्णय पीएमपी संचालक मंडळाकडून रद्दबातल

14 फेब्रुवारी, पुणे : तुकाराम मुंढे यांची बदली होऊन आठवडा उलटत नाही तोच पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने त्यांचे सर्व निर्णय रद्दबातल ठरवलेत. पीएमपीएमएसच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडली त्यात तुकाराम मुंढेंनी 158 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासंबंधीचा घेतलेला निर्णयही तडकाफडकी रद्दबातल ठरवण्यात आलाय. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांनी घरी पाठवलेले 158 कर्मचारी हे दांडीबहाद्दर, कामचुकार या प्रकारात मोडणारे होते. तरीही त्यांना परत कामावर घेण्यात आलंय.

तुकाराम मुंढे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरात वाढ केली होती. त्याला ज्येष्ठ पुणेकरांनी विरोध दर्शवला होता म्हणून हा निर्णय देखील मागे घेण्यात आलाय. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या जागी आलेल्या नयना गुडे यांनीही मागील काळात घेतलेल्या निर्णयांचा फेरआढावा घेणार असल्याचं म्हटलंय. थोडक्यात कायतर तुकाराम मुंढे बदली होऊन जाताच पीएमपीएमएलमध्ये पहिले पाढे पंचावन्न अशीच काहिशी परिस्थिती बघायला मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 02:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close