पंतप्रधान पीक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

पंतप्रधान कृषी पीक विमा योजना 2017साठीचे अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदतवाढ मिळालीय. शेतकऱ्यांना आता 5 ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान पीक विमा काढता येणार आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2017 11:12 PM IST

पंतप्रधान पीक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

मुंबई, 31 जुलै : पंतप्रधान कृषी पीक विमा योजना 2017साठीचे अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदतवाढ मिळालीय. शेतकऱ्यांना आता 5 ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान पीक विमा काढता येणार आहे. याआधी 31 जुलै म्हणजेच आजच अर्ज भरण्याची संपणार होती. बँकेसमोर इच्छूक अर्जदार शेतकऱ्यांच्या रांगा काही केल्या संपत नव्हत्या. बऱ्याच जणांचे पीक विम्याचे अर्ज भरणे राहून गेले आहेत. पण आता या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्टपर्यंत बँकेच्या विविध शाखांमध्ये स्वीकारले जातील. यासाठी सीएससी केंद्र अधिकृत राहणार नाहीत. संबंधीत बँकांनाही मुदतवाढीबाबत ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे. राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनीच पीक विमा मुदतवाढीसंदर्भात आयबीएन लोकमतला माहिती दिली आहे. शेतकरी बांधवानी काळजी न करता वेळेत पीक विमा अर्ज भरावेत आणि पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन फुंडकर यांनी केलंय.

परभणीत याच पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरतेवेळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने सरकारवरही बरीच टीका झाली होती. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा योजनेचा अर्ज स्वीकारण्यास केंद्राकडून अखेर मुदतवाढ मिळाली आहे. इच्छूक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 11:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...