आमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 04:10 PM IST

आमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

कल्याण,(मुंबई)18 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मंगळवारी कल्याणमध्ये 32 हजार कोटींच्या विविध प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधनांनी मराठीत केली. मुंबई आणि ठाण्याने देशाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली असं ते म्हणाले

1) शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, तानाजी मालुसरे, लोकमान्य टिळक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, अहिल्याबाई होळकर यांना मराठीत नमन करत मोंदीची भाषणाला सुरुवात.


2) मुंबई आणि ठाणे ही देशाची स्वप्न साकारणारी शहरं आहेत. या शहरात राहणारी लोकं उदारमतवादी आहेत. या शहरात येणारी माणसं या शहरात मिसळून जातात.


Loading...

3) मुंबईचा विकास होतोय पण पायाभूत सोयी सुविधांवर ताण पडतोय. मुंबई आर्थिक विकासाचं केंद्र आहे. 8 वर्षात फक्त 11 किलोमीटर मेट्रो रेल्वे झाली.

 

 4) आम्ही मेट्रो कामाचा वेग वाढवला आहे. येत्या 3 वर्षात 35 किमी मेट्रोचा मार्ग वाढणार. 2022 ते 2023 मध्ये पावणे तीनशे किमीचे मेट्रो मार्ग उपलब्ध होणार.


5) 2022 ला जेव्हा देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा प्रत्येकाकडे घर असण्याचं स्वप्न आम्ही पाहतोय. गेल्या सरकारपेक्षा आमचा संस्कार आणि वेग पण वेगळाय.


 6) मागच्या सरकारने फक्त 35 लाख घरं बांधली. आम्ही 1 कोटी 25 लाख घरं बांधली. आधीच्या सरकारला इतकी घरी बांधायला दोन पिढ्या लागल्या असत्या.

 

 7) गृह कर्ज, व्याजदर कमी असणार आहेत. गेल्या 7-8 महिन्यात घर विकत घेण्याचा प्रमाण दुप्पट झालंय


8)  मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्रात राज्यात रेरा पहिल्यांदा लागू केला.


 9) आधी वादा काही वेगळा असायचा आणि delivery काही वेगळी असायची आता तसं होणार नाही.


10) दिवे वाटपात महाराष्ट्र पुढे आहे, विजेची बचत मोठ्या प्रमाणात होत आहे, 1100 कोटी विजेचे बिल राज्यात कमी आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...