S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

विधानसभेवर नक्षली हल्ल्याची भिती, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

चिठ्ठीत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यावर हल्ले करणार असल्याचे लिहिले होते

Updated On: Jul 10, 2018 11:42 AM IST

विधानसभेवर नक्षली हल्ल्याची भिती, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

नागपूर, 10 जुलैः नागपुरात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनावर आता संकटाचं सावट निर्माण झालं आहे. विधानसभेवर संभाव्य नक्षली हल्ला होणार असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाली आहे. विदर्भात असलेले नक्षलवाद्यांचे जाळे लक्षात घेऊन पोलीस विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस विभागाला नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यावर हल्ले करणार असल्याचे लिहिले होते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे कोणीही पंतप्रधानांना भेटू शकत नाही.

नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात मंत्र्यांनाही पंतप्रधानांना भेटणे दुरापास्त झाले आहे. यासंदर्भात विशेष सुरक्षा पथकाने (एसपीजी) पंतप्रधानांची सुरक्षा अधिक अभेद्य केली होती. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट आखला होता असा धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांनी केला होता. पकडलेल्या नक्षलवाद्यांकडून काही पत्रं पोलिसांनी हस्तगत केली हेती. या पत्रांमध्ये ज्याप्रमाणे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती, त्याप्रमाणेच हत्या करण्याचा कट रचण्यात येत होता.हेही वाचाः

पावसामुळे जागोजागी कोंडी, घराबाहेर न पडण्याचा सल्ला

पुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून

भरपावसात लोकस सुसाट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close